आंध्र मुख्यमंत्र्यांविरुद्धच्या सुनावणीतून न्या.ललित बाहेर

Supreme Court

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे (SC) क्रमांक दोनचे न्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा (Justice N. V. Ramana) आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसह अनेक न्यायमूर्तींवर कटकारस्थान व पक्षपाताचे गंभीर आरोप जाहीरपणे केल्याबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी केलेल्या याचिकांवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतून न्या. उदय उमेश ललित यांना माघार घेतली.

जी.एस. मणी आणि सुनील कुमार सिंग या दोन वकिलांनी या याचिका केल्या आहेत. त्या याचिका सोमवारी सुनावणीस आल्या तेव्हा न्या. ललित यांनी ही सुनावणी आपण करणार नसल्याचे सांगताना नमूद केले की, पूर्वी या प्रकरणातील काही पक्षकारांसाठी वकील या नात्याने मी काम केले आहे. त्यामुळे ही सुनावणी माझ्यापुढे व्हावी, असे मला वाटत नाही. मी यातून बाहेर पडत आहे.

त्यामुळे आता या याचिका सरन्यायाधीश ज्यात न्या. ललित नाहीत अशा दुसºया एखाद्या खंडपीठापुढे सुनावणीस लावतील.

सरन्यायाधीश न्या. रमणा व अन्य न्यायाधीशांवर गंभीर आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री रेड्डी यांनी सरन्यायाीश न्या. शरद बोबडे यांना ठविले होते.

नंतर त्यांच्या कार्यालयाने ते पत्र माध्यमांना प्रसिद्धीसाठी दिले होते. मुख्यमंत्र्यासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने असे आरोप केल्याने लोकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास उडेल. त्यामुळे रेड्डी यांना त्या पदावर राहण्यास अपात्र घोषित करून पदच्यूत केले जावे, अशी विनंती दोन पैकी एका याचिकेत आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER