न्या. काटजू ‘कन्टेम्प्ट’ प्रकरणावर विचारास अ‍ॅटर्नी जनरलचा  नकार

Maharashtra Today

नवी दिल्ली: बँकांची कर्जे बुडवून भारतातून परागंदा झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी(Nirav Modi) याच्या प्रत्यार्पण प्रकरणात इंग्लंडमधील न्यायालयात सादर केलेल्या कायदेशीर अभिप्रायात भारतातील न्यायसंस्थेबद्दल केलेल्या विधानांवरून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्या. मार्कंडेय काटजू यांच्याविरुद्ध न्यायालयीन अवमानना (Contempt of Court) याचिका दाखल करण्यासाठी संमती मागणाºया अर्जावर विचार करण्यास अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांनी नकार दिला आहे.

अलख आलोक श्रीवास्तव या वकिलाने वेणुोगपाळ यांच्याकडे संमती मागणारा अर्ज केला होता. वेणुगोपाळ यांनी श्रीवास्तव यांना असे उत्त्र पाठविले आहे की, मी न्या. काटजू यांना गेली १६ वर्षे ओळखतो व तेव्हापासून आमच्या भेटीगाठी होत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’साठी संमती मागणाºया अर्जावर मी विचार करणे योग्य होईल, असे मला वाटत नाही. मात्र ‘कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट’ कायद्याचा हवाला देऊन त्यांनी पुढे असे लिहिले की, कायद्यानुसार अ‍ॅटर्नी जनरल किंवा सॉलिसिटर जनरलची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे वाटल्यास तुम्ही संमतीसाठी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे अर्ज करू शकता.

इंग्लंडमधील जिल्हा न्यायालयाने प्रत्यार्पणाविरुद्ध नीरव मोदीने केलेली याचिका फेटाळताना दिलेल्या निकालात न्या. काटजू यांनी मोदीच्या बाजूने दिलेल्या व्यक्तिगत अभिप्रायात भारतातील न्यायसंस्थेविषयी केलेली पुढील विधाने उद््धृत केली होती: ‘ गेल्या काही वर्षांत भारतातील न्यायसंस्था सरकारधार्जिणी झाली असून नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारे नि:ष्पक्ष व स्वतंत्र असे शासनाचे अंग ही भूमिका ती बजावत नाही.‘ ‘ सरकारविरुद्धच्या एका संवेदनशील प्रकरणात विकृत दृष्टिकोन ठेवून सरन्यायाधीशांनी सरकारची तळी उचलून धरली व नंतर या सरन्यायाीशांना (निवृत्तीनंतर) संसद सदस्य नेमून बक्षिशी दिली गेली.’

न्या. काटजू यांच्या या विधानांचा संदर्भ देऊन त्यांच्याविरुद्ध ‘कन्टेम्प्ट’ची परवानगी मागताना श्रीवास्तव यांनी असे लिहिले होते की, ही विधाने करून न्या. काटजू यांनी न्यायंसस्थेविषयी लोकांच्या मनात असलेल्या आदराला धक्का लावला आहे व न्यायसंस्थेचे उघडपणे अप्रतिष्ठा केली आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button