राज्य ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी न्या. पीआर बोरा

Maharashtra Today

नागपूर:राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या (Consumer Grievance Redressal Commission) अध्यक्षपदी न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांतने त्यांचे अभिनंदन केले आहे.

अतिप्रचंड प्रमाणात ग्राहकांच्या तक्रारी प्रलंबित असल्यामुळे न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्या नियुक्तीने ग्राहकांना न्याय मिळून त्यांच्या समस्या मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष श्यामकांत पात्रीकर, प्रांत संघटक डॉ. कल्पना उपाध्याय व प्रांत सचिव लीलाधर लोहरे यांनी एका निवेदनात केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व ग्राहक आयोगांचे कामकाज पूर्णवेळ रविवारवगळता उशिरापर्यंत सुरू ठेवावे, दरमहा ५०० तक्रारी निकाली काढण्याचे लक्ष्य ठेवून, वेगाने ग्राहकांच्या तक्रारी निकाली काढाव्यात तसेच जिल्हा ग्राहक आयोग अध्यक्षांच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ सदस्यास कंजूमर प्रोटेक्शन मॉडेल रुल्स २०२० चे नियम क्रमांक ६ अनुसार, राज्य शासनाला शिफारस करून, कायमस्वरूपी प्रदान करीत असल्याची अधिसूचना काढून घ्यावी, ज्यामुळे कामकाज अखंड चालेल, अशी व्यवस्था करावी. तसेच, आपण स्वतः प्रत्येक महिन्याला एक आठवडा नागपूर येथे कामकाज करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. आपल्या नियुक्तीने समस्याग्रस्त ग्राहकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button