‘फक्त एकदा स्पर्श कर…’ रणवीर सिंगने शेअर केला अनुभव!

ranveer singh

मुंबई : तुम्ही ऐकले असेल… बॉलिवूड अभिनेत्री बर्‍याचदा कास्टिंग काऊचला बळी पडतात. यावर आजकाल बऱ्याच अभिनेत्री स्पष्टपणे बोलतात आणि लोकांसमोर आपले अनुभव मांडतात. पण, हे फक्त अभिनेत्रींसोबतच होते असे नाही. यशस्वी बॉलिवूड अभिनेतेही कास्टिंग काऊचला बळी पडले आहेत.

यातच आता बघायचं झालं तर अभिनेता रणवीर सिंगदेखील कास्टिंग काऊचचा शिकार ठरला होता. त्याने हा किस्सा स्वतःच शेअर केला आणि म्हणाला की, कास्टिंग काऊच हे बॉलिवूडशी संबंधित एक सत्य आहे. NDTV दिलेल्या जुन्या मुलाखतीत रणवीर सिंगने आपल्यासोबत घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला होता. वास्तविकता म्हणजे, रणवीर सिंग त्याच्या संघर्षाच्या दिवसात कास्टिंग काऊचचा बळी ठरला होता. रणवीर म्हणाला की, “मला मीटिंगपूर्वीच त्यांनी असे सांगितले होते की, आपण एक सद्गृहस्थाला भेटणार आहोत. त्या व्यक्तीने माझा पोर्टफोलिओ एकदाही बघितला नाही. मी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. माझ्या माहितीनुसार, ५०० पानांचे पोर्टफोलिओ कोणीही बघणार नाही. म्हणून, मी एक अतिशय प्रभावी पोर्टफोलिओ डिझाईन केला होता.

जो एकदा तरी बघेलच… परंतु, त्याने एक नजरही टाकली नाही.” रणवीर सिंग पुढे म्हणाला की, “शोबिजच्या जगात पुढे जाण्यासाठी तुम्हाला स्मार्ट आणि मादक व्हायला हवे, असे त्या व्यक्तीने मला सांगितले.” पण या दरम्यान, त्या व्यक्तीने रणवीरला पुढे येऊन एकदा त्याला स्पर्श करण्यास सांगितले. मात्र, रणवीरने त्याला स्पष्टपणे नकार दिला. तो माणूस त्याच्यावर दबाव आणत राहिला आणि रणवीर त्याला नकार देत राहिला. एखाद्या प्रेमवीराचे हृदय तुटल्यासारखा तो त्याच्यावर रागावला होता.

मीच नाही, इतर लोकांसोबतही घडले

या घटनेनंतर रणवीरने ही गोष्ट बऱ्याच नव्या कलाकारांच्या लक्षात आणून दिली आणि आपला अनुभव सांगितला. यावर त्यांनीदेखील रणवीरप्रमाणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, असे रणवीरने सांगितले. यासोबतच त्याने रणवीरला सांगितले की, त्या व्यक्तीशी त्यांचीही भेट अशीच काहीशी झाली आणि तेदेखील कास्टिंग काऊचला बळी पडले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button