अंगात नुसते विदर्भाचे रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई : अंगात केवळ विदर्भाचे रक्त असून चालणार नाही; विदर्भाशी प्रामाणिक राहा, असा टोमणा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मारला. ते विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या ‘वर्षभराचा लेखाजोखा’ च्या प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. हा कार्यक्रम गुरुवारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते झाला.

फडणवीस म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकतेच म्हणाले होते की, आमच्या अंगात विदर्भाचे रक्त आहे. त्यांच्यावर किमान हे म्हणण्याची तरी वेळ आली याचे आम्हाला समाधान आहे. पण, विदर्भाचं नुसते रक्त असून चालणार नाही कारण अनेक नेत्यांनी विदर्भाशी बेईमानी केली, तशी बेईमानी तुम्ही करु नका.” विदर्भाच्या विकासासाठीची वैधानिक विकास मंडळाची काम बंद का झाली? असा प्रश्न फडणवीस यांनी ठाकरेंना विचारला.

सरकारने विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय केल्याचा फडणवीस यांनी पुनरुच्चार केला. मराठवाड्यात सिंचनाची आणि ‘वॉटर ग्रीड’ची कामं बंद का आहेत. याबद्दल तुम्ही चकार शब्द का काढत नाही?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER