मतदार नोंदणीसाठी फक्त मिस्डकॉल द्या : पालकमंत्री सतेज पाटील यांचा उपक्रम

Satej Patil

कोल्हापूर : एक जानेवारी 2021 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur) शहरातील युवक-युवतींना “ 9175119599 ” या नंबरवर एक मिस्डकॉल अथवा पूर्ण नाव आणि पत्ता व्हॉट्सअ‍ॅप केल्यानंतर आपले नाव मतदार यादीत नोंदवता येणार आहे. पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी उपक्रम सुरू केला आहे.

भारत बलशाली देश बनविण्यात येथील युथची ताकद फार महत्वाची आहे. जगातील मोठे लोकशाही राष्ट्र असणाऱ्या भारताची लोकशाही मजबूत करण्याकरीता योग्य प्रतिनिधीची निवड होण्यासाठी प्रत्येक भारतीयाने मतदानाचा हक्क बजावणे, ही काळाची गरज आहे. ज्या युवकांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांनी या अभियानात भाग घेऊन स्वतःचे नाव मतदार म्हणून नोंद करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही मिस्डकॉल, व्हॉट्सअ‍ॅप सुविधा सुरू करण्यात आली आहे. मिस्डकॉल अथवा पूर्ण नाव आणि पत्ता व्हॉट्सअ‍ॅप आल्यानंतर नामदार पाटील यांच्या कार्यालयातील लोक संबधितांच्या घरी येऊन मतदार नोंदणी साठी संपूर्ण सहकार्य करणार आहेत. मतदार नोंदणी साठी येणाऱ्या प्रतिनिधीला आपली माहिती, घरातील मतदार असलेल्या व्यक्तीचे निवडणूक ओळखपत्र, आपला फोटो, रहिवास दाखला आणि वयाचा दाखला स्कॅन करण्यासाठी देऊन सहकार्य करावे. वयाच्या पुराव्यासाठी साठी जन्म दाखला, मार्क्सशिट, पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, आधार कार्ड या पैकी एक आणि राहिवासाचा पुरावा म्हणून पासपोर्ट, ड्रायविंग लायसेन्स, बँक / किसान / पोस्ट ऑफिस करंट पासबूक, रेशन कार्ड, इन्कम टॅक्स असेसमेंट, भाडे करार पत्र, पानी, टेलिफोन, लाईट बिल, गॅस कनेक्शन बिल, पोस्टामार्फत आलेले पोस्ट / पत्र / मेल या पैकी एक दाखला आवश्यक आहे. याचा फायदा कोल्हापूर शहरातील जास्तीत जास्त तरुण युवक आणि युवतींनी घ्यावा असे आवाहन नामदार सतेज पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER