‘ड्रग्ज’बद्दल फक्त चॅट केले; कधी घेतले नाही ! – दीपिका

Deepika Padukone

मुंबई : ‘ड्रग्ज’बद्दल  (Drugs)  कॅट केले; पण कधी घेतले नाही, असे अभिनेत्री दीपिका पदुकोन  (Deepika Padukone) हिने एनसीबीला सांगितले. दीपिकासोबत सारानेही ड्रग्ज घेतले नाही, असे म्हटले आहे. कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पदुकोनची एनसीबी चौकशी सुरू आहे.

दीपिकाची मॅनेजर करिश्माला दीपिकासमोर बसवून तिला प्रश्न विचारण्यात आले. एनसीबीने (NCB) दीपिकाचा फोनही काढून घेतला आहे. आज सकाळी पावणेदहा वाजता गेट वे ऑफ इंडिया येथील एनसीबीच्या कार्यालयात दीपिका चौकशीसाठी हजर झाली. १० वाजता तिची चौकशी सुरू झाली.

दीपिकाची मॅनेजर करिश्माही १० वाजता एनसीबी कार्यालयात आली होती. दोघींना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येते आहे. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, ड्रग्जबाबतच्या व्यवहाराच्या चॅटमध्ये दीपिकाचे नाव आल्याने तिची चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER