मुंबईत शाळेबाहेर असणाऱ्या खाऊच्या दुकानावर बंदी !

junk food

मुंबई :- मुंबईत शाळेबाहेर विकला जाणारा खाऊ आता बंदीच्या रडारवर आहे. या सोबतच शाळा आणि रुग्णालयाबाहेर इतर जंक फूडच्या दुकानावर सुद्धा बंदी येणार आहे. नवीन फेरीवाला धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा आणि १०० रुग्णांची क्षमता असणाऱ्या रुग्णालयाबाहेर चणे,शेंगदाणे, फळे आणि नारळ पाणी व्यतिरिक्त कोणतेही खाद्यपदार्थ विकता येणार नाहीत. याशिवाय धार्मिक स्थळांसाठी ही या नियमाची अंमलबजावणी केली आहे. तर मंदिर परिसरात फक्त प्रार्थनेशी संबंधित वस्तू विकण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही.

ही बातमी पण वाचा : १ एप्रिल पासून २४ तास मिळणार वीज ; ग्रामीण भागाला दिलासा