राज्यात 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार, हसन मुश्रीफ यांची घोषणा

Hasan Mushrif

कोल्हापूर : संपुर्ण भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडवर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होतो. यापुढे हा दिवस शिवस्वराज्य दिन (Shivswarajya Day) म्हणून संपुर्ण राज्यात साजरा केला जाणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, रयतेच्या हिताचा कारभार कसा असावा आणि तो कसा चालवावा, याचे सर्वोत्तम उदारहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेला राज्य कारभार आहे. त्यांनी 17 व्या शतकात महाराष्ट्रात भूमीपूत्रांचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. या महापुरूषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे 6 जून 1674, म्हणजे शिवराज्याभिषेक दिन होय.

स्वताच्या सार्वभौम स्वराजाचा पवित्र मंगलकलश जनतेला अर्पण करून रयतेची झोळी सुख, समृध्दीने भरली होती. याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता. तो दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी विविध स्तरातून करण्यात येत होती. त्यानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदत कार्यालयात हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER