महाराजासाठी आमिरच्या मुलगा जुनैदने केले वजन कमी

जसा बाप तसा मुलगा अशी एक म्हण आहे. आज या म्हणीची आठवण आमिर खान (Amir Khan) आणि त्याच्या मुलाने जुनैदने (Junaid) करून दिली. जुनैदही पित्याप्रमाणे सिनेमात नायक म्हणून यशराजच्या ‘महाराजा’ सिनेमातून एंट्री करणार असल्याचे आम्ही तुम्हाला सांगितले होते. या सिनेमाचे काही दिवसांपूर्वी शूटिंगही सुरु करण्यात आले. या शूटिंगमध्ये जुनैदने भाग घेतला होता. मात्र ते शूटिंग फक्त दोन-तीन दिवसांचेच होते. मुहुर्त असल्याने तो साधण्यासाठी शूटिंगला सुरुवात केली होती. आता या सिनेमाचे पुन्हा शूटिंग सुरु केले जाणार आहे. मात्र या शूटिंग शेड्यूलसाठी आमिरच्या मुलाने जुनैदने स्वतःमध्ये प्रचंड बदल घडवून आणल्याने जुनैद पित्याच्या पावलावर पाऊल टाकणार असल्याचे दिसत आहे.

यशराजसाठी सिद्धार्थ मल्होत्रा ‘महाराजा’ सिनेमा करीत आहे. या सिनेमात जुनैद एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. मोठ्या घरचा मुलगा असल्याने जुनैदला खाण्यापिण्याची कमतरता नव्हती. त्यामुळेच तो प्रचंड जाडा दिसत होता. त्याचे फोटो पाहून हा हीरो बनू शकेल असे कोणाला वाटले नव्हते. पण आमिरचा मुलगा असल्यानेच त्याला यशराजने संधी दिली. जाड असलेल्या जुनैदने काही दिवसातच वजन कमी करून सगळ्यांना धक्का दिला आहे. या नव्या रुपातील जुनैदला प्रथम तर ओळखताच आले नाही. मुंबईतील एका रेस्टॉरन्टबाहेर आमिर खान, इरा खान यांच्यासोबत एक मुलगा दिसला होता. तो मुलगा जुनैद होता. मात्र त्याला कोणीही ओळखले नव्हते. आमिर, इरा आणि जुनैदचा फोटो सोशल मीडियावर शेअर झाला आणि तो आता चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोत आमिर खान कॅज्युअल लुकमध्ये असून इरा खान टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. तर जुनैदही कॅज्यु्अल लुकमध्ये दिसत आहे. जुनैदचे हे नवे रूप पाहून सगळेच चकित झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER