आरोग्य विभागात २ हजार २२६ पदांची जम्बो भरती; राजेश टोपेंची माहिती

मुंबई :- देशात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. मात्र, ही लाट नियंत्रणात आली असून काही राज्यांत अनलॉक करण्यात आला आहे. तसेच तिसरी लाट येण्याची भीतीची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात (Health Department) जम्बो भरतीचा (Jumbo recruitment) निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यात तब्बल २ हजार २२६ पद भरली जाणार आहे. राज्य सरकारने संकटाशी सामना करण्यासाठी कंबर कसली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आरोग्य विभागात लवकरच जम्बो भरती केली जाईल, अशी माहिती दिली होती. अखेर, राज्य सरकारने याबद्दल आदेश काढला असून आरोग्य विभागात एकूण २ हजार २२६ पदांची जम्बो भरती होणार आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाअंर्तगत ग्रामीण क्षेत्रामध्ये विविध आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सदर आरोग्य संस्थांचे ७५ टक्के बांधकाम पुर्ण झालेले आहे. तसेच अनुक्रमांक १२ आणि १५ येथील शासन निर्णयान्वये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर युनिट इत्यादी आरोग्य संस्थांकरीता आवश्यक असणाऱ्या पदांची भरती करण्यात येणार आहे.

औषध निर्माण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी गट-अ, गट-ब, आरोग्य सहाय्यक गट- क, सहाय्यक परिचारिका, बहुउद्देशिय आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका प्रसविका, अंशकालीन स्त्री परिचर अशी पदे भरण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button