स्पुतनिक लस : जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार; पेडणेकरांची माहिती

मुंबई : मुंबईत स्पुतनिक लसीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार आहे. स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी विशेष कोल्ड स्टोरेजच्या जागेची चाचपणी सुरू आहे. याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्यांनी पत्रकार परिषदेत लसीकरणासह विविध विषयावर भाष्य केले.

मुंबईकरांना सोयीस्कर जाईल अशा जागी स्पुतनिक लसीच्या साठवणुकीसाठी जम्बो कोल्ड स्टोरेज उभारणार. स्पुतनिकसाठी अद्यापही रेड्डीज लॅबवर अवलंबून आहे. स्पुतनिकच्या कोल्ड स्टोरेजचा प्रश्न आहे. भारतात लसीच्या ५ कंपन्या आहेत. पण रेड्डीज अशी एकमेव कंपनी आहे, ज्याला परवानगी आहे. ते पुरवठादेखील करू शकतात. कांजूरमार्गचे कोल्डस्टोरेज आहे, तिथे कोविशील्ड लसीचा साठा केला जातो. ईस्टर्न आणि वेस्टर्नला लस साठवता येईल का, यावर चर्चा केली जाईल.” असे पेडणेकर म्हणाल्या.

लहान मुलांवर प्रयोग

नागपूरमध्ये मेडिकल कॉलेजमध्ये लहान मुलांवर लसीचे प्रयोग केले जात आहेत. नागपूरप्रमाणेच मुंबई महापालिकेलाही अशी परवानगी मिळावी, यासाठी आधीच केंद्राला सांगण्यात आले आहे. मात्र परवानगी मिळाली नाही, अशी माहिती महापौरांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button