जुही चावलाची मुलं तिचे चित्रपट पाहात नाहीत

Juhi Chawla

बॉलिवुडमध्ये (Bollywood) जुही चावला (Juhi Chawla) सुंदरता आणि तिच्या निखळ हास्यामुळे लोकप्रिय झाली होती. आमिर खानसोबत (Aamir Khan) कयामत से कयामत तकमधून बॉलिवुडमध्ये प्रवेश केलेल्या अल्पावधीतच बॉलिवुडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होेते. जुही अनेक हिट चित्रपट दिले असून शाहरुखसोबत (Shahrukh Khan) काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. एवढेच नव्हे तर शाहरुखसोबत आयपीएलमध्ये (IPL) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघात गुंतवणूकही केली आहे. अभिनेत्री असलेली जुही चावला एक चांगली व्यावसायिकही आहे. तसेच ती एक चांगली पत्नी आणि आईही आहे. लग्नानंतर तिने आपले संपूर्ण आयुष्य पति आणि मुलांना समर्पित केले आहे. आईच्या रुपातील जुहीवर तिची मुले खूप प्रेम करतात. जुहीची मुले बॉलिवुड आणि मीडियापासून लांब असतात. नायिका म्हणून जुहीने काम केलेले चित्रपट ते पाहात नाहीत. स्वतः जुहीनेच एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

एका मुलाखतीत तुझी मुलेही बॉलिवुडमध्ये येणार आहेत का असा प्रश्न जुहीला विचारला असता, तिने सांगितले, मुलांनी काय करावे याचा निर्णय मी त्यांच्यावरच सोपवला आहे. ते जे करतील त्याला माझा संपूर्ण पाठिंबा असेल. त्यांनाच लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. त्यांच्याकडे इंटरनेट आहे आणि त्यांना हवे तर ते सोशल मीडियावर राहू शकतात. परंतु त्यांना त्याची आवड नाही. तसेच मीसुद्धा त्यांना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहाण्यासाठी आग्रह धरीत नाही. ते जेव्हा माझ्यासोबत बाहेर येतात तेव्हा वैतागतात. कारण माझे अनेक फॅन आणि फोटोग्राफर आमचे फोटो काढण्यासाठी आम्हाला थांबवत असतात. माझे फॅन माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांना आवडत नाही. म्हणून ते माझ्यासोबत बाहेर येत नाहीत. एवढेच नव्हे तर ते माझे चित्रपटही पाहात नाहीत असेही जुही म्हणाली.

याचे कारण विचारले असता जुहीने सांगितले, माझ्या मुलाला याबाबत विचारले असता त्याने सांगितले, आई तुला वाईट वाटणार नसेल तर मी सांगतो. मी तुला पडद्यावरही दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही आणि त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच मी तुझे चित्रपट पाहात नाही. मात्र त्यांना बॉलिवुडमध्ये काम करायचे असले तर मला सगळ्यात जास्त आनंद होईल. दोघेही सध्या शिकत असून, ते दोघे जे काही करतील त्यात मला आनंदच असेल असेही जुहीने म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER