जुही चावलाची 5G बाबत खबरदारीची याचिका

Juhi Chawla on cautionary petition regarding 5G technology

मुंबई : अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) मागील अनेक वर्षांपासून मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनविरोधात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. खबरदारी न घेता भारतात 5G टेक्नॉलॉजी (5G technology) लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात तिने याचिका दाखल केली असून आज त्यावर सुनावणी होणार आहे.

जुही चावलाने याचिकेत मागणी केली आहे की, “5G टेक्नॉलॉजी लागू करण्याआधी याच्याशी संबंधित सर्व संशोधनावर बारकाईने विचार करुन त्यानंतरच ही टेक्नॉलॉजी भारतात लागू करा.” जुहीने याचिकेत दूरसंचार मंत्रालयाला आवाहन केले आहे की, “5G टेक्नॉलॉजी लागू केल्यास सामान्य जनता, जिवाणू, झाडं-झुडपं आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांशी संबंधित संशोधनाचा बारकाईने अभ्यास करा आणि त्यांच्या अहवालाच्या आधारावर ती भारतात लागू करायची की नाही याबाबत निर्णय घ्या.”

एका वृत्तवाहिनीशी बोलताना जुही म्हणाली की, “आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान लागू करण्याच्याविरोधात नाही. उलट, यामधून निर्माण होणाऱ्या नवनव्या उत्पादनांचा आपण लाभही घेतो, ज्यात वायरलेस कम्युनिकेशनचाही समावेश आहे. परंतु या उपकरणांच्या वापराबाबत आपण आजही गोंधळाच्या स्थितीत आहोत. कारण वायरफ्री गॅजेट्स आणि नेटवर्क सेल टॉवर्सशी संबंधित आपल्याच संशोधनातून हे स्पष्ट होते की अशाप्रकारचे रेडिएशन नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी अतिशय हानीकारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button