मुंबई एअरपोर्टवर हरवले अभिनेत्री जुही चावलाचे हिऱ्याचे कानातले ; शोधून देणाऱ्याला मिळणार बक्षिस

juhi-chawla- Diamond earring

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) हिचे हिऱ्याचे कानातले मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) हरवले असून तिने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून याबाबत माहिती दिली आहे. तसेच, कानातले शोधणाऱ्याला बक्षीस देणार असल्याचेही जुहीने म्हटले आहे .

जुहीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , सकाळी (रविवारी) मी मुंबई एअरपोर्टच्या गेट नंबर 8 मधून जात होती. Emirates Counter वर मी चेक-इन केलं, सिक्युरिटी चेकिंग झाली, पण यादरम्यान माझे हिऱ्याचे कानातले कुठेतरी पडले. कोणी माझी मदत केली तर मला खरंच खूप आनंद होईल. मी गेल्या १५ वर्षांपासून हे कानातले सतत घालत आहे…कृपया ते शोधण्यामध्ये माझी मदत करा… कानालते सापडले तर कृपया पोलिसांना माहिती द्या…मी तुम्हाला बक्षीस देईन”, असे जुही चावलाने पोस्टमध्ये लिहिले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER