जुही चावलाने जय मेहतासोबतचे लग्न लपवून ठेवले होते सहा वर्षापर्यंत; सांगितले हे कारण

Juhi Chawla

बॉलिवूड(Bollywood) अभिनेत्री जुही चावला (Juhi Chawla) क्वचितच रुपेरी पडद्यावर दिसते; पण तिच्या अभिनयाला लोक चांगलेच पसंत करतात. तिला बहुतेक वेळ कुटुंबासमवेत घालवणे आवडते. आज जुही चावला तिचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी, व्यावसायिक जय मेहतासोबत तिच्या प्रेमकथेविषयी जाणून घेऊ जे चित्रपटापेक्षा कमी नाही.

जुहीने जय मेहताबरोबरचे लग्न बरेच दिवस लोकांपासून लपवून ठेवले होते. एका मुलाखती दरम्यान जुहीने अखेर असे का केले, हे सांगितले. जुहीने सांगितले की, त्यावेळी लग्न म्हणजे नायिकेच्या कारकिर्दीचा शेवट असायचा. मी माझ्या कारकिर्दीच्या शिखरावर होते. मला माझ्या कारकिर्दीला कोणत्याही प्रकारे हानी पोहचवायची नव्हती. मला माझे करिअर सुरू ठेवायचे होते म्हणून लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नाही आणि काम करत राहिले. जुहीने आपले लग्न सहा वर्षे जगापासून लपवून ठेवले होते.

तिने प्रेमकथेविषयी सांगितले की, माझी आणि जयची पहिली भेट मी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वीच झाली होती. तथापि, चित्रपटात आल्यानंतर आमचे संभाषण होते. नंतर आम्ही एका पार्टीत भेटलो आणि संभाषण सुरू झाले. सुरुवातीला दोघांनाही एकमेकांमध्ये विशेष रस नव्हता. जय मेहता यांच्या पत्नीचे विमान अपघातात निधन झाल्याचे जेव्हा जुहीला समजले तेव्हा जयबद्दल जुहीचे वर्तन बदलले.

या दरम्यान कारच्या अपघातात जुहीच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर जय मेहता यांनी तिला सांभाळले. दोघेही बऱ्यापैकी एकमेकांच्या जवळ होते. त्या काळात जय मेहता यांनी जुहीला या संकटातून मुक्त होण्यासाठी मदत केली होती. यानंतर या दोघांनी १९९५ साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. जुही चावलाची मुलगी जाह्नवीचा जन्म २००१ मध्ये झाला. दोन वर्षांनंतर जुहीने अर्जुनला जन्म दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER