निकालपत्रात बहरली न्यायाधीशांची काव्यप्रतिभा!

आरोपीला जामीन देताना काव्यबद्ध निकाल

Court

नवी दिल्ली : दिल्लीतील एका सत्र न्यायाधीशांची काव्यप्रतिभा निकालपत्रातून बहरली असून आरोपीला आपण का जामीन मंजूर करत आहोत याची संपूर्ण कारणमीमांसा त्यांनी तब्बल २६ ओळींच्या कवितेतून मांडली आहे. देशातील हे बहुधा पहिलेच काव्यबद्ध निकालपत्र असावे.

गेल्या फेब्रुवारीत वायव्य दिल्लीत झालेल्या दंगलीच्या वेळी जाफराबाद भागात गोळीबार करून राहुल नावाच्या एका व्यक्तीला जखमी केल्याच्या आरोपावरून बाबू नावाचा आरोपी एप्रिलपासून अटकेत आहे. त्याला १० हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचा आदेश देताना शाहदरा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमिताभ रावत यांनी हे काव्यमय निकालपत्र दिले आहे. दंगलीत ज्याला गोळी लागली तो राहुल तेव्हापासून बेपत्ता असून पोलिसांनी त्याची जबानीही नोंदविलेली नाही.

कॅ. सतीश नावाच्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जबानीवरून पोलिसांनी इमरान आणि बाबू या दोन आरोपींना अटक केली. त्यापैकी इमरानला आधीच जामीन  मिळाला आहे. न्यायाधीश रावत यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद कवितेत संक्षेपाने मांडून, पोलिसांच्या कथनात काही दम नसल्याने मी आता आरोपी बाबूला तुरुंगातून मोकळे करून, खटला संपेपर्यंत सरकारला तुरुंगात टाकत आहे, असे या काव्याच्या शेवटच्या कडव्यात मिस्कीलपणे नमूद केले आहे.

निकालपत्रातील या कवितेचे मराठीत भाषांतर करणे तिच्या दर्जेदार काव्यगुणांवर अन्याय करणारे ठरेल. त्यामुळे वाचकांना मूळ इंग्रजी कवितेचाच निर्भेळ आस्वाद घेता यावा यासाठी ती जशीच्या तशी खाली दिली आहे :

Babu pleading for his bail; State opposing tooth and nail. Summers bygone, winters have arrived; But crime you did, and Rahul cried. I am not the one, I am not the one; Too grave the charge, don’t pretend. Whom did I attack, where is he; Oh! That we know, in the trial we will see. You say I have said & I deny from the first blush; Rahul may be gone yet Satish said. Didn’t we say; don’t rush; Let me go, let me go, even Imran is on bail. Even then, even then; it wouldn’t be a smooth sail. Stop! Stop! Stop! Stop; I have heard, heard a lot. Mind is clear, with claims tall; Its my time to take a call. Babu has a sordid past; proof is scant, which may not last. His omnipotence can’t be assumed; Peril to vanished Rahul, is legally fumed. FIR No. 145/20 State vs. Babu 2 of 3 Take your freedom from the cage you are in; Till the trial is over, the state is reigned in. The State proclaims; to have the cake and eat it too; The Court comes calling ; before the cake is eaten, bake it too.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER