राम मंदिराचा निकाल 17 नोव्हेंबरला लागण्याची सरन्यायाधीश गोगोई यांना अपेक्षा

Gogoi

नवी दिल्ली :- मध्यस्ती संदर्भात पॅनलचे पत्र मिळाले आहे. जर आपसात चर्चेतून तोडगा निघत असेल तर ते कोर्टास कळवावे. मध्यस्थी देखील केली जाऊ शकते. मध्यस्ती संदर्भात गुप्तता बाळगली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाचे
सरन्यायाधीश रंजन गोगोई आश्वस्त केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की या दरम्यान सुनावणी सुरूच राहील. अर्थात 17 नोव्हेंबर पर्यंत यावर निकाल येईल. उल्लेखनीय बाब म्हणजे, गोगोई याच दिवशी निवृत्त होत
आहेत.

26 व्या दिवशीची अयोध्येत राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अयोध्या प्रकरणी सर्वच पक्षांना मिळून
प्रयत्न करावा लागेल. सोबतच, पक्षकारांनी ठरवून कोर्टाला त्यासंदर्भात माहिती द्यावी. या प्रकरणाची सुनावणी 18 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार अशी शक्यता आहे. यानंतर न्यायाधीशांना निकाल लिहिण्यासाठी 4 आठवडे लागतील.
त्यातही पक्षकारांना मध्यस्थी किंवा इतर पर्याय मान्य असतील तर ते देखील न्यायालयास सूचवावे असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. अयोध्या प्रकरणात 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाने आपला निकाल जारी केला
होता. त्याच निकालाच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हायकोर्टाने त्यावेळी दिलेल्या निकालानुसार, अयोध्येचा 2.77 एकर परिसर तीन भागांमध्ये विभाजित केले जावा. यात सुन्नी
वक्फ बोर्ड, निर्मोही अखाडा आणि रामलला विराजमान यांच्यात वाटली जाईल.