अल्पवयीन मोलकरणीला छळणारी न्यायाधीश बडतर्फ

naini Tal

नैनिताल : एक १३ वर्षाच्या मुलीला आपल्या घरी मोलकरीण म्हणून कामास ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याबद्दल उत्तराखंड सरकराने दीपाली शर्मा या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीशास सेवेतून बडतर्फ  केले आहे. उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने केलेली शिफारस मान्य करून राज्यपाल बेबी राणी मौर्य यांनी तसा आदेश जारी केला. उच्च न्यायालयानेच दिलेल्या आदेशावरून पोलिसांनी शर्मा यांच्या हरिद्वार येथील सरकारी निवासस्थानी धाड टाकून छळ होणाºया या अल्पवयीन मोलकरणीची सुटका केली होती. त्यानंतर शर्मा यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरु केली गेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER