जू वेनजूनला बुध्दिबळ जगज्जेतेपदासाठी हवा फक्त एक गूण

Ju wenjun

व्लाडिव्होस्टॉक(रशिया) : महिलांच्या विश्व बुध्दिबळ अजिंक्यपद लढतीत वार्तमान विश्वविजेती जू वेनजून हिने आपले जगज्जेतेपद कायम राखण्याच्या दृष्टीने स्थिती भक्कम केली आहे.तिने रशियन प्रतिस्पर्धी अॕलेक्झांद्रा गोरिश्चकिना हिच्यावर एका गुणाची आघाडी घेतली आहे.

दहाव्या डावाअखेर जू वेनजूनचे 5.5 गूण तर अॕलेक्झांड्राचे 4.5 गूण आहेत आणि या लढतीतील आता फक्त दोन डाव बाकी आहेत. आठव्या डावाअखेर रशियन खेळाडू एका गुणाने आघाडीवर होती पण जू वेनजून हिने नववा आणि दहावा असे लागोपाठ दोन डाव जिंकून मुसंडी मारली आहे. आता तिने आणखी एक गूण कमावला तर तिचे जगज्जेतेपद कायम राहणार आहे. अॕलेक्झांड्राला मात्र आता उरलेले दोन्ही डाव जिंकावेच लागणार आहेत. 12 डावांअखेर बरोबरी झाली तर टाय ब्रेक डाव होणार आहेत.

…जेंव्हा गोलंदाजाने केली फलंदाजाची धुलाई!

लढतीतील आतापर्यंतचे डाव

  • पहिला- बरोबरी
  • दुसरा- बरोबरी
  • तिसरा—बरोबरी
  • चौथा—-जू वेन जून
  • पाचवा– गोरिश्चकिना
  • सहावा– बरोबरी
  • सातवा– बरोबरी
  • आठवा– गोरिश्चकिना
  • नववा- जू वेनजुन
  • दहावा- जू वेनजुन