काँग्रेसच्या राजकुमाराने पाकिस्तानवर तरी विश्वास ठेवावा! नड्डा यांचा राहुलला टोमणा

JP Nadda slams Rahul gandhi

नवी दिल्ली : भारत हल्ला करेल या भीतीमुळे पाकिस्तानने भारताच्या लढाऊ विमानाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Abhinandan Vardhman) यांना ताबडतोब सोडले, असे पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत सांगितले. याचा हवाला देऊन भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांनी राहुल गांधी (Rahul gandhi) याना टोमणा मारला – काँग्रेसच्या राजकुमाराने पाकिस्तानवर तरी विश्वास ठेवावा!

भारताचा पाकिस्तानवर किती दरारा आहे हे दर्शविणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी पाकिस्तानच्या संसदेमध्ये सांगितले की, भारत हल्ला करेल या भीतीमुळे पाकिस्तानने भारताच्या लढाऊ विमानाचे पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना ताबडतोब सोडले.

या व्हीडीओने भारतीय जनता पार्टीला राहुल गांधींवर टीका करण्याची संधी मिळाली. भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा राहुल गांधींना टोमणा मारताना म्हणाले की, काँग्रेसच्या राजकुमाराला भारताच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही. ते सरकार असो, सैन्य असो की आमचे लोक. यामुळे त्यांनी त्यांच्या सर्वात विश्वासार्ह देश पाकिस्तानचे ऐकले पाहिजे. आता त्यांचे डोळे उघडतील, अशी आशा आहे.

काँग्रेस आपल्या सैन्याला कमकुवत करण्याचा प्रचार करत आहे. कधी त्यांची थट्टा केली तर कधी त्यांच्या वीरतेवर संशय घेतला. सैन्याला अत्याधुनिक राफेल मिळू नये यासाठी सर्व युक्त्या केल्या. परंतु, देशवासीयांनी या राजकारणाला नाकारून काँग्रेसला अद्दल घडवली आहे, असे नड्डा म्हणालेत.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनीही ट्विटवरून राहुल गांधींवर हल्ला केला. म्हणाले – राहुलजी तुम्ही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करत होता. पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भीती आहे. पाकिस्तानसाचे लष्करप्रमुख थरथर कापत होते. त्यांना घाम फुटला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER