भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

कोल्हापूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेली बिहार व अन्य राज्यातील निवडणुकीचे निकाल आज पहाटे स्पष्ट झाले. पोटनिवडणुकीत गुजरात, मध्य-प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा या राज्यांत भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवले. बिहार राज्यात ७४ जागी भाजपाचे उमेदवार विजयी झाले. या विजयाबद्दल भारतीय जनता पार्टी (BJP) कोल्हापूरच्यावतीने (Kolhapur) प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, देश का नेता कैसा हो…नरेंद्र मोदी (Narendra Modi) जैसा हो, भारत माता की जय अशा घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या. हलगीच्या तालावर ठेका धरत सर्वांनी हा आनंदोत्सव साजरा केला.

सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, आजचा दिवस भारतीय जनता पार्टीसाठी आनंदाचा आहे. इतर सर्व पक्ष एकट्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभे ठाकले होते. परुंतु बिहारच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे हे यश मिळाल्याचे नमूद केले.

जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, आजचे निकाल भारतीय जनता पार्टीसाठी दिवाळीपूर्वी मिळालेली दिवाळी भेट असल्याचे नमूद केले. याचधर्तीवर आगामी काळात भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विजय संपादन करण्याचा निर्धार या निमित्याने आपण सर्वांनी करूया असे सांगितले. यावेळी भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER