राज्यातील पत्रकारांनी आरोग्य मंत्र्यांना पाठवले मागणीचे हजारो एसएमएस

Rajesh Tope

मुंबई : पत्रकारांच्या राज्यव्यापी आंदोलनास आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना राज्यभरातून आठ हजारावर एसएमएस पाठविले गेले आणि जोरदार पाऊस असताना देखील राज्यातील जवळपास ३०० तालुक्यात पत्रकारांनी तोंडाला काळे मास्क लावून तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करून तहसिलदार तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी प़सिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोरोनामुळे (Corona) मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत मिळावी, पत्रकार विमा योजना सुरू करावी, कोरोनानं आजारी पत्रकारांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ची तात्काळ व्यवस्था व्हावी आणि पत्रकार संतोष पवार (Santosh Pawar) आणि पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांच्या मृत्यूस जबाबदार असणारयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राज्यातील पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या आवाहनानुसार आज राज्यभर आंदोलन केले.. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना प्रत्येक जिल्हयातून २०० ते २५० या प्रमाणे आठ हजारांवर एसएमएस पाठवून पत्रकारांनी आपल्या तीव़ भावना व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER