एनडीटीव्ही आणि एबीपीचे पत्रकार अंगावर धावून आले; रिपब्लिकच्या भंडारींचा आरोप

Pradeep Bhandari

मुंबई : एनडीटीव्ही आणि एबीपीच्या पत्रकारांनी मला धक्काबुक्की केली, असा आरोप रिपब्लिक टीव्हीचे पत्रकार प्रदीप भंडारी (Pradeep Bhandari) यांनी केला. माहीत आहे, महाराष्ट्रात खरे बोलण्याची किंमत काय आहे? ( जानते है महाराष्ट्र में सच बोलने की क़ीमत क्या है? ) या त्यांच्या ट्विटच्या व्हिडीओत दिसते की, काही लोक त्यांच्या अंगावर धावून जात आहेत. पोलीस त्यांना आवरत आहेत.

प्रदीप यांचा आरोप आहे की, त्यांच्या अंगावर धावून जाणारे हे एका वाहिनीचे पतंगरकर आहेत. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या संशयित मृत्यूच्या वार्तांकनात सुशांत समर्थक आणि इतर असे दोन गट पडल्यासारखे झाले असून दोघेही आक्रमकपणे वार्तांकन करत आहेत. यात ते एकमेकांविरुद्ध उभे झाले आहेत.

आज सकाळी गेटवे ऑफ इंडियाजवळ घडलेल्या या घटनेबद्दल प्रदीप यांनी ट्विट केले आहे –
जानते है महाराष्ट्र में सच बोलने की क़ीमत क्या है?

कार्टेल के नामी-गिरामी चेहरे जैसे-जैसे एक्सपोज़ हो रहे है, उनका ग़ुस्सा और बढ़ता जा रहा है।जब पुलिस से भी काम नहीं बना तो आज NDTV और ABP के गुंडे पत्रकारों को मेरे पास हाथपाई करने भेज दिया। लेकिन मैं टूटने वालों में से नहीं हूँ।

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER