
मुंबई : अनिल देशमुख यांना गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशमुखांकडे दिले, असा गौप्यस्फोट शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या सामनातून केला आहे. त्यावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांनी राऊतांना इशारा दिला होता. मात्र, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राऊत यांची पाठराखण केली आहे.
आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटले की, ‘कान उघाडणी करणे, कौतुक करणे केलेल्या कामाची स्तुती करणे, कधीतरी टिका करणे. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे. त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येते. फक्त आपले कायम कौतुकच होईल, अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये’.
कान उघाडणी करणं, कौतुक करणं केलेल्या कामाची स्तुती करणं, कधीतरी टिका करणं. हे स्तंभ लेखकांच व पत्रकारांच कामच आहे.
त्याच्यातून शिकायलाही मिळत आणि पुढची पावल कशी टाकायची हे समजूनही घेता येतं.
फक्त आपलं कायम कौतुकच होईल अशी अपेक्षा कोणीच बाळगू नये.— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 28, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला