आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला !

Sharad Pawar- Eknath Khadse

मुंबई: ज्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला वाढवण्यासाठी आपलं ४० वर्षांचं आयुष्य घालवाल त्यांना पक्षात न्याय मिळाला नाही. तिथे आपली काय गत होईल, याचा विचार भाजप युवा मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करावा. त्यामुळे तुम्हीदेखील भाजपचा (BJP)त्याग करुन आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चला, असे आवाहन खडसे समर्थकांनी जळगावातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना केले. भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर प्रचंड अन्याय झाला. त्यांच्या या निर्णयाची आम्ही गेल्या एक-दीड वर्षापासून वाटच पाहत होतो. नाथाभाऊ आता राष्ट्रवादीत गेल्यावर आम्ही त्यांच्यासोबतच राहू, अशी भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केली.

एकनाथ खडसे आज दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहे. त्यासाठीते गुरुवारीच मुंबईत दाखल झाले होते. यासाठी खडसे यांचे मुक्ताईनगरमधील समर्थकही मुंबईत दाखल झाले आहेत. या समर्थकांनी माजी मंत्री गिरीश महाजनयांनाही लक्ष्य केले. गिरीश महाजन (Girish Mahajan) केवळ नाथाभाऊंसोबत आहोत, असे दाखवत होते. पण प्रत्यक्षात ते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे मित्र होते. यामुळेच ते नाथाभाऊंना सुप्तपणे विरोध करत होते, अशी खदखद या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER