पाकिस्तानातली पहिली हिंदू महिला होणारा प्रशासकीय सेवेत रुजू

Maharashtra Today

भारत (India) आणि पाकिस्तानही (Pakistan) शेजारील राष्ट्र इंग्रजांच्या फाळणीमुळं अस्तित्त्वात आली. फाळणीनंतर बरीच वर्ष दोन्ही राष्ट्रांमध्ये धार्मिक दंगली होत राहिले. अनेक युद्धांना दोन्ही राष्ट्र सामोरी गेली. पाकिस्तानात नंतरच्या काळात वाढत गेलेला दहशतवाद. चीननं गिळलेली पाकिस्तानी अर्थव्यस्था आणि या सर्वांमध्ये हिंदू समुहांवर होणारा धार्मिक अत्याचार अशा बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो, परंतू आता मात्र एक सुखावणारी बातमी पाकिस्तानातून येते आहे. पाकिस्तानच्या प्रशासनात पहिल्यांदा हिंदू महिलेची निवड झालेली आहे. पाकिस्तानच्या प्रशासन सेवेत पहिली भारतीय महिला रुजु झाली आहे. ‘सना रामचंद’ (Sana Ramchand) असं तिच नाव असून ती पाकिस्तानची ‘पीएसएस’ परिक्षा (PSS Exam) पास झाली आहे. पाकिस्तान प्रशासकीय सेवेमधून ती उत्तीर्ण झाल्यानंतर तीनं हा मान पटकवला (administrative service to become the first Hindu woman in Pakistan)आहे.

कोण आहे सना रामचंद?

सना रामचंद ही एमबीबीएस डॉक्टर आहे. ती पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असणाऱ्या सिंध प्रांतातली आहे. सिंधू प्रांतातील शिकारपूर हा तिचा जिल्हा आहे. सनानं चंदका मेडीकल कॉलेजमधून एमबीबीएस पुर्ण केलंय. यानंतर कराचीतल्या सरकारी दवाखान्यामध्ये ती कार्यरत होती. यानतर ‘सिंध इन्टीट्यूट ऑफ न्युरोलॉजी अँड ट्रांसपेरेंट’मधूत त्यांनी एफसीपीएसचं शिक्षण पुर्ण केलं. यानंतर सर्जन म्हणून त्यांनी ओळख कमावली.

अशी झाली प्रशासकीय सेवेत निवड

प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी सुरुवातील भारतातल्या युपीएससीप्रमाणं प्रक्रिया असते. यात पहिल्यांदा लिखीत परिक्षा घेतली जाते. ही परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा अंतिम निवड होते. यात मेडीकल, सायकॉलॉजी आणि तोंडी परिक्षा पार पडतात. सेंट्रल सुपीरियर सर्विसमध्ये निवड झाल्यानंतर पीएसची नियुक्ती सहाय्यक महासंचालकाच्या पदावर होते या पदावरुन बढती मिळाली की थेट महासंचालक होता येतं. या परिक्षेत पाकिस्तानच्या ‘माहिन हसन’ अव्वल स्थानी होत्या. सनासोबत तिचीही निवड या पदासाठी झालेली आहे.

यशस्वी झाल्यानंतर काय म्हणाली सना?

निकाल लागल्यानंतर सनानं ट्वीट करत “वाहे गुरु का खालसा, वाहे गुरु की फते, मला वाटतं की अल्लाहनं मला तुम्हा सर्वांनी हे सांगायची अनुमती दिली आहे की मी सीएसएस २०२० च्या परिक्षेत उत्तीर्ण झाली आहे. याचे पुर्ण श्रेय माझ्या आई वडीलांना जातं.” म्हणत सर्वांना आनंदाची बातमी दिली. सना ने सांगितलं की तिचं लेटेस्ट परसेंटेज २ पर्सेंट होतं. यातून किती स्पर्धा या पदासाठी होती हे अधोरेखित होतं. अगदी युपीएससी सारखी ही परिक्षा कठीण असल्याचं सनानं सांगितलं. यानंतर अनेक मुलाखतींमधून तिनं केलेल्या तयारीची माहिती तिनं लोकांना दिली.

शुभेच्छांचा वर्षाव

सनाच्या निवडीनंतर उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर अनेकांच लक्ष होतं. पाकिस्तानात महिला प्रतिनिधीत्व आजकाल कमी होताना दिसतं आहे. अशा परिस्थीती एका हिंदू तरुणीनं प्रशासकीय सेवेत मिळवलेलं स्थान बरंच काही सांगून जातं. पाकिस्तानातले वरिष्ठ नेते फरहतुल्लाह बाबर यांनी सना अधिकारी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, “पाकिस्तानातील हिंदू समुहासाठी सनाचं अधिकारी बननं ही गर्वाची बाब आहे. सनाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.” सोशल मिडीयावर (Social Media) यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. अनेकांनी फेसबूक, इन्सटा, ट्वीटरवरुन सनाला शुभेच्छा दिल्यात. हिंदू समुदायासाठी ही अभिमानाची बाब असल्याचं अनेकांच म्हणनं आहे. पुढं सीएसएस २०२० मध्ये जास्ती जास्त हिंदू महिलांनी सहभाग घ्यावा असं नेटकऱ्यांच म्हणनं होतं.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रतील गंभीर होत असलेल्या कुपोषणाच्या प्रश्नाचं उत्तर मध्यप्रदेशात शोधावं लागेल!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button