करोना लस प्रयत्नांना धक्का?; दुष्परिणाम दिसल्याने या कंपनीने चाचणी थांबवली

johnson-johnson-halts-covid-19-vaccine.jpg

वॉशिंग्टन : करोनाच्या संसर्गाला (Corona Crises) अटकाव करण्यासाठी जगभरात लस विकसित (covid-19-vaccine) करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही लशींची चाचणी अंतिम टप्प्य्यात आली आहे. काही कंपन्यांनी लसीची चाचणी अंतिम टप्प्यावर आल्याची घोषणाही केली आहे. मात्र अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन (johnson-johnson) कंपनीने या लसीची चाचणी अचानक काही काळासाठी थांबवली आहे. स्वयंसेवकांवर याचे दुष्परिणाम दिसून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सने दिलेल्या माहितीनुसार, लस चाचणीत सहभागी असलेल्या एका स्वयंसेवकामध्ये एक अनोळखी आजार आढळून आला. त्यामुळे करोना प्रतिबंधक लशीची चाचणी थांबवण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र समिती बनवण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत ६० हजार स्वंयसेवकांचा सहभाग असणार होता. यासाठी स्वयंसेवकांची ऑनलाइन नोंदणीदेखील थांबवली आहे. दरम्यान,अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने कोरोनावर लस शोधून काढली आहे. या लसच्या चाचण्या सध्या सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER