जाणून घ्या, जॉन रिड व मोहम्मदुल्ला भल्याभल्या ऑलराऊंडर्सनाही का आहेत भारी?

John Reid - Mohammadullah

न्यूझीलंडचे जॉन रिड आणि बांगलादेशचा मोहम्मद मोहम्मदुल्ला….हे दोघे फारसे नावाजलेले, खूप काही यशस्वी क्रिकेटपटू नाहीत तरीसुध्दा या दोघांच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील असा एक विक्रम आहे जो इतर कुणाच्याच नावावर नाही. विशेष म्हणजे अष्टपैलूत्वाचा हा विक्रम आहे आणि बोथम, हॅडली , कपिल, इम्रान, कॅलिस, डीविलियर्स अशा नावाजलेल्या अष्टपैलूंनाही तो जमलेला नाही.

काय असेल हा विक्रम याची तुमची उत्सुकता चाळवली असणार तर बघा…कोणत्याही क्रिकेटपटूची कारकिर्द आकडेवारीत मांडायची तर पुढीलप्रमाणे रकाने असतात..

सामने, डाव, नाबाद, धावा, सर्वोच्च, सरासरी, शतके, अर्धशतके, चेंडू/ षटके, धावा, बळी, सरासरी, सर्वोत्तम गोलंदाजी, डावात 5 बळी, झेल, यष्टीचित

कर्णधाराच्या बाबतीत सामने, विजय, पराभव आणि अनिर्णित असे रकाने असतात.

माझी मुलाखत पूर्ण वाचली असती तर…. – डॉमिनिक थिएम

तर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात हे दोनच असे खेळाडू आहेत ज्यांचे हे सर्वच्या सर्व रकाने भरले आहेत. म्हणजे आपल्या कारकिर्दीत त्यांनी शतकेही केली आहेत, अर्धशतकेही केली आहेत, डावात 5 बळीसुध्दा घेतले आहेत, झेलसुध्दा घेतले आहेत आणि यष्टीचित म्हणजे स्टम्पिंगसुध्दा केले आहे. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे तर ठीक आहे पण त्यांनी विकेटकिपींगसुध्दा केली आहे आणि त्यात यशसुध्दा मिळवले आहे. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या संघाचे कर्णधारपदसुध्दा भुषवून विजयसुध्दा नोंदवला आहे.

असे कर्तबगार क्रिकेटपटू तुम्हाला या दोघांशिवाय शोधुनसुध्दा सापडणार नाही.

आता अधिक तपशिलाता जायचे तर त्यांची कारकिर्द या आकडेवारीतच बघू या….

कामगिरी—-महम्मदुल्ला—– जॉन रिड
सामने——— 49————— 57
डाव———– 93————— 108
नाबाद——– 06—————- 05
धावा———- 2764———— 3428
सर्वोच्च——- 146 ————- 142
सरासरी——- 31.77———– 33.28
शतके———- 04————— 06
अर्धशतके—– 16————— 22
शून्य———— 11————— 05
षटके———– 566.3——— 1240.1
धावा———– 1949———– 7725
बळी———— 43————— 85
सरासरी——– 45.33———- 33.35
डावात 5 बळी- 01————– 01
सर्वोत्तम——– 5/ 51———- 6/60
झेल————- 38————– 43
स्टम्पिंग——— 01—————01
कर्णधार———06—————34
विजय———– 01————– 03
पराभव———- 04————– 18

आता हे दोघे फलंदाजी व गोलंदाजीत चमकले हे तर ठीक आहे पण ते यष्टीरक्षक नसताना त्यांनी एक-एक फलंदाज यष्टीचित केला हे कसे…तर जुलै 1958 मध्ये इंग्लंडविरुध्दच्या मँचेस्टर कसोटीत जॉन रिड यांनी इंग्लंडचा सलामीवीर पी. ई.रिचर्डसनला 74 धावांवर स्टम्पिंग केले. न्यूझीलंडचा नियमीत यष्टीरक्षक इ.सी.पेट्री हा फलंदाजीवेळी चेंडू हूक करताना जखमी झाला होता म्हणून कर्णधार असलेल्या जॉन रिड यांनी यष्टीरक्षण केले होते. यष्टीरक्षक म्हणून दोन झेलसुध्दा त्यांच्या नावावर होते.

मोहम्मद मोहम्मदुल्लाच्या बाबतीत असे घडले की त्यांचा नियमीत यष्टिरक्षक कर्णधार मुशफिकूर रहमान हा 2015 मध्ये पाकिस्तानविरुध्दच्या खूलना कसोटीत यष्टीरक्षण करु शकला नाही त्यावेळी मोहम्मदुल्लाहने ग्लोव्हज हाती घेतले आणि झुल्फिकार बाबरला यष्टीचित केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला