जॉन अब्राहमचा ‘ढाई किलो का हात’

John Abraham

बॉलिवुडमध्ये (Bollywood) धर्मेंद्रची (Dharmendra) ओळख हीमॅन म्हणून आहे. त्याचा मुलगा सनीही (Sunny Deol) बॉलिवुडमध्ये बलदंड नायक म्हणून ओळखला जातो. अनेक अॅक्शनपटात सनीने त्याच्या अॅक्शनच्या जलवा दाखवलेला आहे. बलदंड सनीची इमेज आणखी बलदंड व्हावी म्हणून निर्माते, दिग्दर्शक त्याच्याकडून फुटपाथवरील हँडपंप उखडून दाखवण्याची अचाट कामगिरी करून घेत असतात. याच सनीचा दामिनी सिनेमातील एक डायलॉग प्रचंड लोकप्रिय आहे. हा डायलॉग आहे, यह ढ़ाई किलो का हात जब पडता है तब आदमी उठता नहीं उठ जाता है. आज या डायलॉगची आठवण झाली ती जॉन अब्राहमने (John Abraham) सोशल मीडियावर टाकलेल्या एका फोटोमुळे.

बॉलिवुडमधील अनेक नायक स्वतःच्या शरीरयष्टीकडे संपूर्ण लक्ष देत असतात. रोज व्यायाम करून शरीर फिट ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु असतात. जॉन अब्राहमही याच नायकांच्या श्रेणीत येतो. तो फिटनेसबाबत प्रचंड जागरुक आहे. कितीही कामात बिझी असला तरी जॉन व्यायाम करणे चुकवत नाही. त्याच्या या व्यायाम करण्याच्या आवडीमुळेच त्याने बलदंड शरीरयष्टी कमावली आहे. सध्या जॉन ‘सत्यमेव जयते 2’ सिनेमाचे शूटिंग करीत आहे. या शूटिंगच्या वेळेचाच फोटो समोर आला असून तो आता प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत जॉन त्याचा हात दाखवत असून त्याच्या हातावरील टरारलेल्या शिरा त्याच्या बलदंडपणाची साक्ष देत आहेत. त्याचा असा हात पाहून त्याचे फॅन्स तर चकित झालेच आहेत बॉलिवुडमधील कलाकारांनीही जॉनची यासाठी प्रचंड प्रशंसा केली आहे. जॉनचा हा सिनेमा खरे तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज होणार होता. परंतु कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग होऊ शकले नाही. आता पुन्हा शूटिंग सुरु झाले आहे.

‘सत्यमेव जयते 2’चा दिग्दर्शक मिलाप झवेरीने हा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना मिलापने लिहिले आहे. ‘हा हात नाही तर जॉन अब्राहमचा हातोडा आहे. यासोबतच त्याने #सत्यमेव जयते 2 #ईद 2021#12 मे2021’ हे हॅशटॅगही टाकले आहेत. मिलापने हा सिनेमा 12 मे रोजी रिलीज केला जाणार असल्याचे यात स्पष्ट केले आहे. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना टायगर श्रॉफने इनसेन अशी कॉमेंट टाकली आहे तर अभिनेता गौतम गुलाटीने शॉकिंग इमोजी शेअर केला आहे. एका फॅनने तर ‘तुझ्याकडे रक्त चेक करण्यासाठी खूप चांगल्या नसा आहेत’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER