‘पठाण’साठी जॉन अब्राहम घेणार 20 कोटी रुपये

John Abhraham

बॉलिवू़डमधील (Bollywood) हंक मॅन म्हणून जॉन अब्राहमची ओळख आहे. धूममध्ये त्याने साकारलेला खलनायक प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्यानंतर जॉनने (John Abhraham) कॉमेडी, अॅक्शन, रोमँटिक, देशभक्तीवर असे विविध जॉनरचे चित्रपट तर केलेच, स्वतः वेगळ्या विषयावरील चित्रपटांची निर्मितीही केली. जॉनची मार्केट व्हॅल्यूही वाढलेली असल्याने त्याला शाहरुख खानसोबत ‘पठाण’ (Pathan) मध्ये घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यशराजच्या या चित्रपटात काम करण्यासाठी जॉनला तब्बल 20 कोटी रुपये दिले जाणार आहेत. जॉनला आजवर देण्यात आलेली ही सगळ्यात मोठी रक्कम आहे. 20 कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याने जॉनही आनंदी आहे.

शाहरुख खाननेही (Shahrukh Khan) चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर यात काम करण्यास होकार दिला होता. हा चित्रपट त्याच्या पुढील वाढदिवसापूर्वी म्हणजे 2 नोव्हेंबर 2021 पूर्वी प्रदर्शित व्हावा अशी शाहरुखची इच्छा आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरु केले जाणार आहे. चित्रपटात शाहरुख आणि जॉन अब्राहमसोबत दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असून प्रेक्षकांना यात वेगळी अॅक्शन पाहायला मिळेल असे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER