जॉन अब्राहम घेणार सलमानशी टक्कर

John Abraham-Salman Khan

एकीकडे सलग सुट्ट्या असलेले कमी आठवडे, तर दुसरीकडे मोठ्या कलाकारांचे सिनेमे तयार होऊन बॉक्स ऑफिसवर (Box office) रिलीज होण्याची वाट पाहात आहेत. सुट्ट्यांचा आठवडा पाहून सगळे मोठे कलाकार आपले सिनेमे रिलीज करतात. एकमेकांचे सिनेमे क्लॅश होऊ नये म्हणून तारखा वाटून घेतात. पण यावर्षी कलाकारांना तारखा वाटून घेण्याची संधी नसल्याने अनेक मोठे कलाकार बॉक्स ऑफिसवर एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे दिसत आहे. जॉन अब्राहमने त्याच्या नव्या सत्यमेव जयते 2 च्या रिलीजची तारीख घोषित केली आहे. मात्र याच दिवशी सलमान खानही (Salman Khan) त्याचा बहुचर्चित राधे रिलीज करणार असल्याने बॉक्स ऑफिसवर जॉन विरुद्ध सलमान असा सामना रंगताना दिसणार आहे.

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जॉन अब्राहमने (John Abraham) त्याच्या प्रशंसकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना ‘सत्यमेव जयते 2’ हा त्याचा नवा सिनेमा 14 मे 2021 रोजी रिलीज करणार असल्याचे सांगितले आहे. खरे तर हा सिनेमा ईदच्या मुहुर्तावर 12 मे 2021 रोजी रिलीज केला जाणार होता. पण जॉनने सिनेमाच्या रिलीजची डेट दोन दिवसांनी पुढे ढकलून 14 मे केली आहे. 12 मे रोजी सलमान खानचा बहुचर्चित ‘राधे’ रिलीज केला जाणार आहे. जॉनने सिनेमाच्या रिलीजची तारीख दोन दिवसांनी पुढे ढकलून शहाणपणा दाखवला आहे असे बॉलिवूडमध्ये म्हटले जात आहे.

जॉनने जेव्हा अगोदर 12 मे ही तारीख नक्की केली तेव्हा, सलमानच्या फॅन्सची संख्या जास्त असल्याने आणि राधेने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केलेली असल्याने त्यापुढे जॉनचा सिनेमा चालला नसता अशी चर्चा बॉलिवुडमध्ये सुरु होती. त्यामुळे जॉनने दोन दिवस सिनेमा पुढे ढकलला. यामुळे पहिले तीन दिवस प्रेक्षकांना ‘राधे’ तर नंतर ‘राधे’ आणि ‘सत्यमेव जयते 2’ असे पर्याय उपलब्ध होतील आणि दोन्ही सिनेमांना प्रेक्षक येऊ शकतील असा कयास आता बांधला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER