या वर्षात जॉन अब्राहमचे 3 सिनेमे होणार रिलीज

John Abraham

गेल्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये कोरोनामुळे बॉलिवूडचे (Bollywood news) खूप मोठे नुकसान झाले. अर्थात सर्वच उद्योगांचे नुकसान झाले. मात्र बॉलिवूडचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर अवलंबून असल्याने आणि थिएटरच बंद असल्याने सिनेमे तयार होऊ शकले नाहीत आणि तयार असलेले रिलीजही होऊ शकले नाहीत. त्यामुळे यावर्षी म्हणजे 2021 मध्ये दरवर्षीपेक्षा जास्त मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. जवळ प्रत्येक आठवड्याला एक मोठा सिनेमा रिलीज होणार असल्याची माहिती आम्ही तुम्हाला दिलीच होती. मात्र यात आणखी वाढ होताना दिसत आहे. अनेक कलाकार आपले सर्व सिनेमे याचवर्षी रिलीज करण्याच्या मूडमध्ये आहेत. कधी नव्हे ते जॉन अब्राहमचेही (John Abraham) तीन सिनेमे यावर्षी रिलीज होणार आहेत.

लॉकडाऊन उठल्यानंतर जॉन अब्राहमने संजय गुप्ताच्या ‘मुंबई सागा’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने ‘सत्यमेव जयते 2’ चे शूटिंग पूर्ण केले आणि आता दिल्लीत ‘अटॅक’ सिनेमाचे शूटिंग करीत आहे. या तिन्ही सिनेमाच्या रिलीजची डेट जॉनने जाहीर केली आहे. मुंबईच्या अंडरवर्ल्डवर आधारित संजय गुप्ताची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला ‘मुंबई सागा’ सिनेमा 19 मार्च 2021 ला रिलीज करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या सिनेमात जॉनसोबत इमरान हाश्मी, सुनील शेट्टी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. त्यानंतर जॉन अब्राहमचा दुसरा सिनेमा मिलाप झवेरीचे दिग्दर्शन असलेला ‘सत्यमेव जयते 2’ ईदच्या मुहुर्तावर म्हणजेच 12 मे 2021 रोजी रिलीज केला जाणार आहे. याच दिवशी सलमान खाननेही त्याचा बहुचर्चित ‘राधे’ सिनेमा रिलीज करणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर जॉनचा तिसरा सिनेमा ‘अटॅक’ 13 ऑगस्ट 2021 ला रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन राज आनंद करीत आहे. या सिनेमात जॉनसोबत जॅकलीन फर्नांडिस आणि रकुलप्रीत सिंह दिसणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER