योहानेस व्हेट्टरची भालाफेकीत विश्वविक्रमाखालोखाल कामगिरी

Johannes Vetter

जर्मनीच्या (Germany) योहानेस व्हेट्टरने (Johannes Vetter) भालाफेकीच्या (Javelin) इतिहासातील दुसऱ्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. रविवारी पोलंडमधील सिलेसिया येथे स्कोलीमौस्का स्मृती स्पर्धेत त्याने 97.76 मीटर दूरवर भाला फेकला. विश्वविक्रमी कामगिरीपेक्षा ही कामगिरी फक्त 72 सेंटीमीटरने कमी आहे. विश्वविक्रम 1996 पासून झेक गणराज्याच्या यान झेलेंझीच्या नावावर आहे.

योहानेस व्हेट्टरने रविवारी तिसऱ्या प्रयत्नात आपली ही कामगिरी नोंदवली. 27 वर्षीय व्हेट्टर हा 2017 मधील विश्वविजेता आहे. पोलंडमधील स्पर्धेत रविवारी दुसऱ्या स्थानावरील स्पर्धक, मार्सिन क्रुकोवस्की हा त्याच्यापेक्षा तब्बल 13 मीटरने मागे होता. महिलांमधील सुवर्णपदक विजेत्या पोलंडच्या मारिया आंद्रेझीकची भालाफेक 65.70 मीटरची राहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER