जोफ्रा आर्चरने वर्ल्डकपबद्दल चार वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी !

England

क्रिकेट विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात निर्माण झालेली असामान्य स्थिती ही अजूनही चर्चेचा विषय आहे. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा हिरो ठरलेला तरुण गोलंदाज जोफ्रा आर्चरने ४ वर्षांपूर्वी या संदर्भात केलेले ट्विट चर्चेत आले आहेत कारण, हे ट्विट आणि या सामन्यातील असामान्य स्थिती यात खूप साम्य आहे.


लंडन : क्रिकेट विश्वचषक २०१९ च्या अंतिम सामन्यात निर्माण झालेली असामान्य स्थिती ही अजूनही चर्चेचा विषय आहे. या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडचा हिरो ठरलेला तरुण गोलंदाज जोफ्रा आर्चरने ४ वर्षांपूर्वी या संदर्भात केलेले ट्विट चर्चेत आले आहेत कारण, हे ट्विट आणि या सामन्यातील असामान्य स्थिती यात खूप साम्य आहे.

हा सामना जिंकून इंग्लंडने विश्वचषक जिंकला पण, या सामन्यात निर्माण झालेल्या स्थितीत कोणते नियम आणि निकष लावण्यात आले आणि ते चूक की बरोबर याबाबत अजूनही चर्चा सुरु आहेत, इतकी असामान्य स्थिती या सामन्यात निर्माण झाली होती.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी १६ धावा करायच्या होत्या. पण न्यूझीलंडला १५ धावा करता आल्या आणि इंग्लंडने विश्वचषक जिंकला.

ही बातमी पण वाचा : ‘ओव्हर थ्रो’च्या चार धावा रद्द करा; खुद्द बेन स्टोक्सने केले होते पंचांना आवाहन

न्यूझीलंडने इंग्लंडला दिलेले २४२ धावांचे लक्ष्य एकावेळी जड जाईल असे वाटत होते. इंग्लंडची धावांचा पाठलाग करताना २४ षटकांत ४ बाद ८६ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. इंग्लंडला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी १५ धावांची गरज होती. इंग्लंडने १४ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.

सुपरओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने १५ धावा केल्या. न्यूझीलंडने या धावांचा पाठलाग करताना १५ च धावा केल्या आणि सामना पुन्हा बरोबरीत सुटला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्याने सर्वाधिक चौकारांच्या आकडेवारीवर इंग्लंडने बाजी मारली.

इंग्लंडचा युवा गोलंदाज जोफ्रा आर्चरनं चार वर्षांपूर्वी या सामन्याचं भाकीत केलं होतं आणि ते रविवारी तंतोतंत खरं ठरलं! जोफ्राला आता लोकं ज्योतिषाचार्य म्हणत आहेत.

जाफ्रा आर्चरने १४ एप्रिल २०१३ ला ६ चेंडूत १६ धावा असे ट्विट केले होते. काल आर्चरनेच इंग्लंडकडून सुपरओव्हर टाकली आणि १५ धावा दिल्या. न्यूझीलंडला विजयासाठी ६ चेंडूत १६ धावांचीच गरज होती!

त्याने दुसरे ट्विट केले आहे २९ मे २०१४ ला. ज्यामध्ये लिहिले होते लॉर्ड्सवर जायची इच्छा आहे. त्याची हे भाकीतही खरे ठरले. इंग्लंडने लॉर्ड्सवर विजेतेपद मिळवले.

त्याचे अजून आश्चर्यजनक ट्विट होते. ५ जुलै २०१५ चे. यात त्याने लिहिलं आहे सुपर ओव्हरमध्येही काहीच अडचण येणार नाही. अन हे ट्विट देखील खरे ठरले; इंग्लंडने सुपरओव्हरमध्येच सामना जिंकला!!