जो रुटची विक्रमी द्विशतकी खेळी, शतकी सामन्यात द्विशतक करणारा पहिलाच

Joe Root

इंग्लंडचा जो रुट (Joe Root, England) हा आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात द्विशतक करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. भारताविरुध्द चेन्नई (Chennai) कसोटीत त्याने आपले पाचवे द्विशतक शनिवारी साजरे केले. त्याचे हे लागोपाठ तिसरे शतक असून त्यात दोन द्विशतक आहेत. षटकारासह आपले कसोटी द्विशतक फळ्यावर लावणारा तो पहिला इंग्लिश फलंदाज ठरला आहे.

आपल्या 100 व्या कसोटी सामन्यात रुटच्या द्विशतकाआधी सर्वोच्च खेळी ही इंझमाम उल हकच्या 184 धावांची (विरुध्द भारत- 2005)होती. शिवाय इंग्लंडच्या कर्णधाराने प्रथमच भारतात भारताविरुध्द द्विशतक केले आहे.

याॕर्कशायर काऊंटीच्या या फलंदाजाचा भारतातील हा सातवा कसोटी सामना असून त्याने या प्रात्येक सामन्यात किमान अर्धशतकी खेळी केली आहे. त्याची आधीची चार कसोटी द्विशतके ही श्रीलंकेविरुध्द लाॕर्डस मैदानावर 2014, पाकिस्तानविरुध्द 2016 मध्ये मँचेस्टरला, न्यूझीलंडविरुध्द 2019 मध्ये आणि गेल्याच महिन्यात श्रीलंकेविरुध्द आहेत. आपल्या 98 व्या, 99 व्या आणि 100 व्या कसोटीत शतक करणारा तो पहिलाच फलंदाज आहे.

मी सध्या फाॕर्ममध्ये आहे आणि त्याचा मी फायदा उचलायला हवा असे त्याने कालच शतक साजरे केल्यावर म्हटले होते.

त्याच्या या द्विशतकासह चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर 10 कसोटी द्वीशतकं नोंदली गेली आहेत, आणि भारतात एकाच मैदानावर सर्वाधिक कसोटी द्विशतकांचा हा विक्रम आहे. आशिया खंडाचा विचार केला तर चेन्नईप्रमाणेच लाहोरला 10 द्विशतकांची नोंद आहे. कोलंबोला 9 तर गाॕल येथे 8 द्विशतक झळकली आहेत.

जो रुटचे द्विशतक हे 2013-14 मध्ये न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॕक्युलमने केलेल्या द्विशतकानंतरचे भारताविरुध्दचे पहिलेच द्विशतक आहे तर भारातातील याआधीचे पाहुण्या फलंदाजाचे शेवटचे द्विशतकसुध्दा मॕक्युलमच्याच नावावर (हैदराबाद 2010-11) आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER