
इंग्लंडचा कर्णधार जो रुट (joe root). याने अपेक्षेप्रमाणे आपले कसोटी सामन्यांचे शतक आणखी एका शतकी खेळीसह साजरे केले. त्याचे हे कारकिर्दीतील 20 वे आणि भारताविरुध्दचे पाचवे शतक ठरले. यात भारतासाठी लक्षात घेण्याची बाब म्हणजे आधीच्या सात वेळा जेंव्हा रुटने भारताविरुध्द शतक केले तो कोणताही सामना इंग्लंडने गमावलेला नाही.
पहिल्या दिवसअखेर तो 128 धावांवर नाबाद परतला असून त्याचे हे सलग तिसरे शतक आहे. याच्याआधी श्रीलंकेविरुध्द त्याने 228 व 186 धावांच्या खेळी केल्या आहेत.
आपल्या 100व्या कसोटीत शतक करणारा तो नववा फलंदाज आहे. त्याच्याआधी काॕलीन काऊड्री (104), जावेद मियांदाद (145), गाॕर्डन ग्रीनीज (149), अॕलेक्स स्ट्युअर्ट ( 105), इंझमाम उल हक (184), रिकी पोंटींग (120 व 143), ग्रॕमी स्मिथ (131), हाशिम आमला (134) यांनी आपल्या 100 वा कसोटी सामना शतकासह साजरा केला आहे.
भारतात त्याचा हा सातवा सामना असून या प्रत्येक सामन्यात त्याने किमान अर्धशतकी खेळी केली आहे.
- 73 व 20 – नागपूर – 2012
- 124 व 4 – राजकोट- 2016
- 53 व 25 – विशाखापट्टणम- 2016
- 15 व 78 – मोहाली- 2016
- 21 व 77 – मुंबई- 2016
- 88 व 6 – चेन्नई – 2016
- 128 नाबाद- चेन्नई – 2021
भारतात सलग अर्धशतकी खेळींचे कसोटी सामने खेळण्यात आता केवळ जावेद मियांदाद हाच त्याच्यापुढे आहे. जावेदने 1980-87 दरम्यान भारतातील 8 सामन्यांमध्ये 50 पेक्षा अधिक धावांच्या खेळी केल्या आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला