जो रूटने केव्हन पीटरसनसह अनेक दिग्गजांना मागे केले, प्राप्त केले हे विशेष स्थान

Kevin Peterson,Joe Root

इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये जो रूट चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने १८६ धावा केल्या.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) आपल्या देशासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या प्रकरणात रूटने केविन पीटरसन (Kevin Peterson) आणि डेव्हिड गोव्हरला मागे केले आहे.

जो रूटने प्राप्त केले विशेष स्थान

इंग्लंडचा कर्णधार रूटने रविवारी गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात १८६ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने एकूण १८ चौकार ठोकले. पहिल्या कसोटीत शानदार द्विशतक झळकावणारा रूटचे दुसऱ्या कसोटीत केवळ १४ धावांनी दुहेरी शतक हुकले. मात्र दुसऱ्या डावात रूटला केवळ ११ धावा करता आल्या. असे असूनही इंग्लंडने ही मालिका २-० ने जिंकली.

रूटने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये १८० डावांमध्ये ८,२३८ धावा केल्या आहेत आणि इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक अव्वल स्थानावर आहे.

कूकने १६१ कसोटीत १२,४७२ धावा केल्या आहेत. त्याच्यापाठोपाठ ८,९०० धावा असलेल्या ग्रॅहम गूचचा समावेश आहे. एलेक स्टीवर्ट ८,४६३ धावाांसह तिसर्‍या स्थानावर आहे. रूट नंतर आता गॉवर (८,२३१ धावा) आणि पीटरसन (८,१८१ धावा) आहेत.

जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या आहेत. सचिनच्या पाठोपाठ रिकी पॉन्टिंग (१३,३७८ धावा), जॅक कॅलिस (१३,२८९ धावा) आणि राहुल द्रविड (१३,२८८ धावा) आहेत.

रूटचा फॉर्म भारतासाठी अलार्म घंटा

टीम इंडिया नुकतीच ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवून भारतात परतली आहे. त्याचबरोबर इंग्लंडने कसोटी मालिकेत श्रीलंकेला २-० ने हरवले आहे. दोन्ही संघांची स्थिती चांगली आहे आणि फेब्रुवारीमध्ये इंग्लंड भारताचा दौरा करेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार कोण कोणावर भारी पडतो.

भारतीय संघाला घरच्या मैदानाचा फायदा नक्कीच होईल, पण ज्या प्रकारे इंग्लंडचा कर्णधार जो रूट प्रदर्शन करत आहे, इंग्लंडच्या संघाला हलकेत घेण्याची चूक भारताला करायला आवडणार नाही.

भारताविरुद्ध रूटची अप्रतिम नोंद

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने श्रीलंकेविरुद्ध आपला सर्वोत्तम फॉर्म मिळविला आहे. या दौर्‍यावर रूटने आतापर्यंतच्या दोन डावांमध्ये दुहेरी शतक आणि एक शानदार शतक झळकावले आहे.

अशा परिस्थितीत भारतीय संघासमोर रूटला रोखण्याचे मोठे आव्हान असेल. इतकेच नाही तर इंग्लंडच्या या सर्वोत्कृष्ट फलंदाजाची नोंद भारतीय संघाविरूद्ध उत्कृष्ट आहे. रूटने १६ कसोटी सामन्यात ५६.४ च्या सरासरीने १४२१ धावा केल्या आहेत. यावेळी त्याने चार भव्य शतकेही केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER