जो बायडनच्या विजयामुळे शेअर बाजारात तेजी

Joe Biden - Stock Market

मुंबई : अमेरिकेच्या (America) राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन (Joe Biden) निवडून आल्याचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. बीएसई ७०४ आणि निफ्टी १९७ च्या उसळीने ४२,५९७ व १२४६१ वर स्थिरावला.

आज दिवसाअखेर शेअर बाजारात तेजी होती. मागील १० महिन्यांच्या तुलनेत सोमवारी सर्वोच्च स्तरावर गेल्याची नोंद करण्यात आली. अमेरिका अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळतो आहे. निवडणुकीमुळे भारतीय शेअर बाजारात मागील सहा दिवसांपासून तेजी आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार बाजारातील ही तेजी आणखी काही दिवस कायम राहील. सोमवारी इंडस बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि एक्सिस बँकेच्या समभागांत (Shares) तेजी होती. सिप्ला, अडानी पोर्ट्स, मारुती, आयटीसी आणि ग्रासीम इंडस्ट्रीज या कंपन्याचे शेअर्स पडले.

६ दिवसांत ८ लाख कोटींची कमाई
भारतीय शेअर बाजार २ नोव्हेंबरपासून तेजीत आहे. भारतीय शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजारमूल्य ८.३ लाख कोटी रुपये झाले आहे. २ नोव्हेंबरला याच कंपन्यांचे बाजारमूल्य १,५७,१८,५७४.९६ कोटी रुपये होते. आज हीच किंमत १,६५,४५,०१४ वर गेली आहे. २ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत समभागधारकांनी (shares) जवळपास ८.३ लाख कोटींची कमाई केली. आज बाजार सुरू झाल्यापासूनच तेजी होती. सकाळच्या सत्रात शेअर बाजार ४२ ५६६.३४ तर निफ्टी १२,४५१.८० वर पोहचला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER