अमेरिकेत सत्तांतरण : जो बायडन अमेरिकेचे नवे अध्यक्ष तर, कमला हॅरिस उपाध्यक्ष

वॉशिंग्टन : गेल्या तीन दिवसांपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण, याचे उत्तर अखेरीस शनिवारी स्पष्ट झाले.अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना कडवी झुंज देणारे जो बायडेन (Joe Biden) यांनी अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला २७० हा बहुमताचा आकडा गाठला. त्यांच्या खात्यात आता २८४ प्रातिनिधिक मते (इलेक्टोरल व्होट्स) आहेत. तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. या विजयाबरोबरच बायडन हे अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. बायडन यांच्याच डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस (Kamla Haris) यांनीही उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून इतिहास घडवला आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून येणाऱ्या त्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आणि आशियाई महिला आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून मतमोजणी सुरु होती. अखेर भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जो बायडन विजयी झाल्याचं अमेरिकन वृत्तसंस्थांनी जाहीर केलं. पेनसिल्वेनिया या राज्यात बायडन यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर बायडन यांचा विजय जाहीर केला गेला. सीएनएन या अमेरिकन वृत्तसंस्थेने जो बायडन यांचा लवकरच शपथविधी होणार असल्याचंही वृत्त दिलं आहे. तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ ग्रहण करतील.

तमोजणी सुरु झाल्यापासून जो बायडन यांनी चांगलीच आघाडी घेतली होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकूण मतमोजणीत पिछाडीवर पडल्याचे चित्र होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायालयीन लढाईची देखील भाषा केली. आज अखेर दोन दिवसांच्या मतमोजणीनुसार बायडन महासत्तेचे महासत्ताधीश म्हणून ओळखले जाणार आहेत.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान मोदींकडून जो बायडन यांचं अभिनंदन, म्हणाले…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER