शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ८० हजार बेरोजगारांना मिळणार नोकऱ्या

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा १२ डिसेंबर रोजी ८० वा वाढदिवस आहे . त्यानिमित्त राज्यातील किमान ८० हजार सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना खासगी, निमशासकीय कं पन्यांमध्ये नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते आणि कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी दिली .

तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सोमवारपासून ‘महास्वयंम’ पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी १२ डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. जे लोक नोंदणी करतील, त्यांना रोजगाराची संधी उपब्ध करून दिली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.

पवार यांचा वाढदिवस साजरा करताना, बेरोजगारांच्या हाताला काम देता येईल का, याचा विचार करण्यात आला. त्यानिमित्त किमान काही बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची योजना राबिवण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी १२ डिसेंबर रोजी ऑनलाइन महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याचेही मलिक म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER