छत्रपती घराण्याचे काम लोकांना पेटवण्याचे नाही, तर न्याय देण्याचे : खासदार संभाजी छत्रपती

MP Sambhaji Chhatrapati

कोल्हापूर :- राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. यापार्श्वभूमीवर काही संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती (MP Sambhaji Chhatrapati) यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे.

छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणं नाही तर न्याय देणं आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू. ताकद दाखवण्यासाठी लोकांचे जीव घेणं योग्य नाही. त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे पाहणं महत्त्वाचे आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button