जितिन प्रसाद यांच्या भाजपाप्रवेशानंतर काँग्रेसला आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता

Maharashtra Today

लखनौ : काँग्रेसचे नेता जितिन प्रसाद (Jitin Prasad)यांनी भाजपात प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. जितिन प्रसाद यांच्या भाजपा(BJP) प्रवेशानंतर काँग्रेसच्या बंडखोर आमदार आदिती सिंह(Aditi Singh) यांनी – विधानसभेची निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवायची हे मी काही दिवसात ठरवणार आहे, असे म्हटले आहे. सिंह यांचे हे विधान काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसण्याचा संकेत मानला जातो आहे.

आमदार आदिती सिंह म्हणाल्या की, पक्षाच्या हायकमांडला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे मी ठरवेन. जितिन प्रसाद यांचे पक्ष सोडणे हा काँग्रेसला मोठा फटका आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उत्तर प्रदेशच्या ग्राऊंड लेव्हलवर उतरून काम करण्याची गरज आहे. पक्षाचे दिग्गज नेते पक्ष का सोडत आहेत? यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

मी सत्य आणि स्पष्ट बोलते. माझे म्हणणे कोणाला वाईट वाटत असेल तर मी काहीच करू शकत नाही. मी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली नाही. मात्र त्यांनी प्रत्यक्षात हे सगळ पाहायला हवे. ज्योतिरादित्य शिंदे, जितिन प्रसाद असे नेते पक्ष का सोडता आहेत, यावर विचार व्हावा. काँग्रेस एका घराण्याचा पक्ष बनत चालला आहे. जितिन प्रसाद यांना भाजपात उज्ज्वल भविष्य आहे, असे आदिती सिंह म्हणालात.

जितिन प्रसाद

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर भाजपामध्ये सामील होणारे जितिन प्रसाद हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेले दुसरे नेते आहेत. जितिन प्रसाद हे माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र प्रसाद (शाहजहाँपूर, उत्तर प्रदेश) यांचे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव यांचे निकटवर्तीय असलेले जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button