स्वातंत्र्यानंतर काश्मीरमध्ये ‘प्रेस एन्क्लेव्ह’वर फडकला तिरंगा

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील लाल चौकात असलेल्या ‘प्रेस एन्क्लेव्ह’च्या (Press Enclave) इमारतीवर पहिल्यांदाच तिरंगा ध्वज फडकला. यासंदर्भात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी ट्विटद्वारे माहिती दिली. काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडकावे हा नेहमीच चर्चेचा आणि वादाचा मुद्दा राहिला आहे. दहशतवाद्यांविरुद्धच्या लढाईला बळ देण्यासाठीही हा मुद्दा नेहमी महत्त्वाचा मानला जातो. यापूर्वी २६ जानेवारी १९९२ सालीही लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. भाजपा नेते मुरलीमनोहर जोशी यांच्या नेतृत्वात प्रजासत्ताकदिनी लाल चौकात तिरंगा फडकला होता. सन १९९२ मध्ये प्रजासत्ताकदिनी लाल चौकात तिरंगा फडकविण्यात आला होता. तत्पूर्वी डिसेंबर १९९१ मध्ये भाजपाने कन्याकुमारी येथून एकता यात्रा सुरू केली होती. जी अनेक राज्यांतून काश्मीरमध्ये पोहचली. काश्मीर हे भारताचेच आहे. याला वेगळे होऊ देणार नाही. तिरंग्याला येथेही सन्मान देणार, असा संदेश या एकता यात्रेतून देण्यात आला होता.

लाल चौक चर्चेत
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्यात आले आहे. ५ ऑगस्ट २०१९ च्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर येथे तिरंगा फडकविण्याबाबत चर्चा राहायची. लेहचे खासदार जामयांग सेरिंग नांग्याल यांनी ऑगस्ट २०२० रोजी आपल्या ट्विटमधून याचे संकेतही दिले होते. जो लाल चौक कधी खानदानी जहागीर होती, दहशतवादी कारवायांचे प्रतीक होते. तो लाल चौक आता राष्ट्रवादाचा मुकुट बनला आहे, असे ट्विट जामयांग यांनी केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button