जितेंद्र शिकतोडे : सफाई कर्मचारी महिलेचा मुलगा झाला तहसीलदार

Jitendra Shiktode

गडचिरोली :- मंगळवेडा नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी लता शिकतोडे (Lata Shiktode) यांचा पुत्र जितेंद्र यांनी चामोर्शीचे तहसीलदार म्हणून सूत्रे स्वीकारली.

जितेंद्र एक वर्षाचे असताना त्यांचे वडील वारलेत. लताबाई यांनी मंगळवेडा नगरपालिकेत रोजंदारी सफाई कामगार म्हणून (त्या वेळी पाच – दहा रुपये रोजीने) काम करणे सुरू केले. गरिबीत दिवस काढत जितेंद्र यांना शिकवले. कुठेही शिकवणी न लावता जितेंद्र यांनी उच्च शिक्षण घेतले व पहिल्याच प्रयत्नात एमपीएससीची परीक्षा पास केली.

जितेंद्र शिकतोडे (Jitendra Shiktode) यांचा परीक्षाविधीन कालावधी नुकताच संपला. कामठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्याम मदणुकर यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जितेंद्र यांना निरोप देण्यात आला. जितेंद्र यांनी चामोर्शीचे तहसीलदार म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER