जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचे मनपाविरोधात आंदोलन; मनसेच्या कार्यकर्त्यांची साथ

Ruta Awhad - Thane Municipal Corporation

ठाणे :- महाराष्ट्रात कोरोनामुळे (Corona) हाहाकार माजला आहे. रोज हजारो नवे रुग्ण आढळत आहेत. मृतांची संख्यासुद्धा वाढत आहे. यामुळे राज्यात आरोग्यव्यवस्था कोलमडत आहे. सर्वत्र ऑक्सिजन, रेमडेसिवीर (Remdesivir) यांचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या (Jitendra Awhad) पत्नी ऋता आव्हाड (Ruta Awhad) आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी ठाणे महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी ऋता आव्हाड यांच्यासोबत मनसेनेचे कार्यकर्तेसुद्धा सहभागी होते. ठाणे जिल्ह्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

रुग्णांची संख्या वाढल्यामुळे येथे आरोग्यव्यवस्थेचे तीनतेरा झाले  आहे. रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेवर मिळत नाही. याच प्रश्नाला घेऊन जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड आक्रमक झाल्या. त्यांनी महापालिकेच्या दालनाखाली ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामध्ये मनसेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा सहभागी होते. तसेच पालिकेवर आरोग्यव्यवस्थेशी संबंधित अनेक आरोप केले. ऋता आव्हाड आणि मनपाचे विरोधी पक्षनेता शानू पठाण यांनी पालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावर ऑक्सिजन फलक आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन घोषणाबाजी केली.

दरम्यान, ऋता आव्हाड, मनसे (MNS) आणि राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज पालिकेची महासभा होती. याच दिवशी राष्ट्रवादी आणि मनसेने आंदोलन केल्यामुळे या आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली.

ही बातमी पण वाचा : अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नव्हे ;   जितेंद्र आव्हाड यांची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button