जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी पुन्हा वाढणार अभियंता मारहाण प्रकरणात तीन पोलिसांना अटक

Jitendra Awhad - Anant Karmuse Case
  • Anant Karmuse Case:राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरील अभियंता अनंत कारमुसे मारहाण प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले. तीन पोलिसांना अटक

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांच्या ठाण्याच्या बंगल्यावर सहा महिन्यांपुर्वी एका अभियंत्याला मारहाण प्रकरण चांगलेच गाजले होते. आक्षेपार्ह फेसबूक पोस्ट वरून हा वाद चिघळला होता. अभियंता अनंत करमुसे (Engineer Anant Karmuse) असे त्या अभियंत्याचे नाव. त्याला आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाण झाल्याचे त्याने सांगितले होते.

सोशल मीडियावर हे प्रकरण अनेक दिवस गाजले. त्यानंतर आता सहा महिन्यांनी पुन्हा या प्रकरणाने डोके वर काढले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यात सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांना झालेल्या मारहाण प्रकरणात सहा महिन्यांनी वर्तकनगर पोलिसांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ( Anant Karmuse Case Latest Updates )

घोडबंदर रोडवरील आनंदनगर भागात राहणारे करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिल रोजी रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले आणि १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. करमुसे यांच्या तक्रारीनंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मारहाणीनंतर ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली होती. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असताना एप्रिल महिन्यात करमुसे यांना मुंबईवरून भेटण्यासाठी निघालेल्या भाजपच्या काही नेत्यांना ठाण्याच्या सीमेवर रोखले होते. या सर्व घडामोडीनंतर वर्तकनगर पोलिसांनी एप्रिलमध्येच पाच आरोपींना अटक केली होती.

त्यानंतर आता या प्रकरणात तीन पोलिसांना अटक करण्यात आली आहे. कोरोनाच्या धामधूमीत हे प्रकरण काहीसे दबले होते. कारण आव्हाड यांना कोरोना झाल्याने अनेक दिवस या प्रकरणावर पडदा पडला होता. आता पुन्हा या प्रकरणाने डोके वर काढले आहे. त्यामुळे आता जितेंद्र आव्हाड कोणती भूमिका घेतात हे पाहण्यासारखे असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER