उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना जितेंद्र आव्हाडांचा टोला; म्हणाले…

CM Uddhav Thackeray - Jitendra Awhad

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना राज्यातील कोरोनाची माहिती देताना उपाययोजनांचेही तपशील सांगितले. तसेच बुधवारी (१४ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस राज्यभर संचारबंदी लागू असणार आहे, अशी घोषणा केली. यावरून विरोधक महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) टीका करताना दिसत आहे.

याला जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर आता होणारी टीका म्हणजे … नाआवडतीचे मीठ अळणी, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला (BJP) टोले लगावले आहेत. जगेल तो जेवेल… मुख्यमंत्री महोदयांनी जे काही केलं ते योग्यच केलं आहे. ती काळाची गरज होती. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक वर्गाचा, गोर-गरिबांचा, शोषितांचा विचार करून या वेळेसचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. सर सलामत तो पगडी पचास, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button