जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही उद्धव ठाकरेंचे स्वागत: बैठकीला काँग्रेस आमदाराची उपस्थिती

uddhav-thackeray-Jitendra award

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले असता त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनाही जोरदार तयारी करत असल्याचे जाणवले. शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची ही भेट होती. फक्त शिवसेनाच नाही तर भाजपचे मंत्री आणि आमदारांनीही त्यांचे स्वागत केले.

विधानभवनाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळच शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी आणि आमदारांनी त्यांचे स्वागत केले त्याच बरोबर भाजपचे मुख्य पक्ष प्रतोद राज पुरोहित, विधिमंडळ कामकाजमंत्री विनोद तावडे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनाच्या पाय-यावर यांनीही उद्धव ठाकरे यांचे पुष्प गुच्छ देऊन उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी सर्व आमदारांनी आश्चर्य व्यक्त केले.

हि बातमी पण वाचा : ‘रागा 2.0’ सुरू; राहुल गांधी विधानसभेसाठी पुन्हा सज्ज

त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या दालनात उद्धव ठाकरे गेले. तिथे त्यांनी आमदारांसबोत चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्व:ता येत उद्धव यांचे स्वागत केलं आणि त्यांनी आपल्या दालनात चर्चा करण्यासाठी आग्रहाने घेऊन गेले.

शिवसेना भाजपच्या बैठकी पूर्वीच दोन्ही पक्षातील दिलजमाई पाहून युती भक्कम असल्याचाच संदेश विरोधकानाही देण्यात आला आहे. शिवसेना आणि भाजपच्या आमदारांच्या बैठकीला बैठकीला काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर हजर होते.

हि बातमी पण वाचा : विधानसभेत अजित पवारांना पराभूत करू म्हटलं तर तुम्ही मोठ्याने हसाल – चंद्रकांत पाटील