‘साहेब माझे विठ्ठल’ : जितेंद्र आव्हाड करणार शरद पवारांवर ‘खास सिरीज’!

Sharad Pawar & Jitendra Awhad

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पुढचा एक महिना शरद पवारांनी गेल्या ५० वर्षांत केलेली कामं एका खास सिरीजच्या माध्यमातून सांगणार असल्याची घोषणा केली आहे. आषाढी एकादशीचे निमित्त साधत जितेंद्र आव्हाड यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. साहेबांबद्दल समज-गैरसमज खूप पसरवले गेले. स्पेशली कुजबुज मोहीम आणि मीडियाने त्यांना प्रचंड बदनाम केले असल्याचे आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

आव्हाडांची फेसबुक पोस्ट :
मागील ५० वर्षांपासून जे काम साहेबांनी या देशासाठी, राज्यासाठी, राज्यातील महिलांसाठी केले आहे, ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाते. सोबतच साहेबांनीदेखील केलेल्या कामाचे कधी मार्केटिंग केले नाही. आजच्या अंबानीच्या सेल्समनसारखा काहीच न करता नुसती जाहिरातबाजी साहेबांनी केली नाही. साहेब ज्या ठिकाणी होते तिथे त्यांनी आपलं काम, आपलं कर्तव्य आणि देशसेवा समजून केलं होतं आणि करत आहेत, असं आव्हाड म्हणाले आहेत. थोडंसं जाणून घेऊयात आपण शरद पवारांविषयी आणि त्यांच्या अवाढव्य कामाविषयी. आजपासून एक महिना तुम्हाला खूप इंटरेस्टिंग माहिती देत राहू. जमली तर नक्की वाचा. टीका तर नेहमीच करता आपण . यावेळी त्यांना थोडं जाणून घ्या. तुमच्या मतात नक्की फरक पडेल हा विश्वास आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER